अतिमहत्वाचे

सुस्वागतम ...सुस्वागतम ...सुस्वागतम ...zppsraigavhan.blogspot.com वर मी श्री .भारत जलिंदर सावंत ( स.शि. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायगव्हाण ता.परतूर जि.जालना )आपले सहर्ष स्वागत करीत आहे ...

ब्लॉग तयार करायला शिका

ब्लॉग तयार करायला शिका



        आज सर्वच शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण देण्यासाठी अनेक नाविण्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. तुमच्या शाळेतील या उपक्रमांची माहिती इतरही शाळांना व्हावी यासाठी आज सोशल मिडियाचा सर्वात जास्त वापर केला जात आहे.
     तुम्हालाही तुमच्या शाळेचे इंटरनेटवर एक स्वतंञ संकेतस्थ्‍ळ तयार करायचे असल्यास याठिकाणी ब्लॉग कसा तयार करावा ? या विषयी सविस्त्‍र माहिती देण्यात येत आहे. तिचा वापर करुन आपण आपल्या  शाळेचा ब्लॉग , वेबसाईट तयार करु शकता. काही अडचण आल्यास 9890433979 या क्रमांकावर कॉल करा. आपली अडचण निश्चितच सोडविण्याचा पुरेपुर प्रयत्न्‍ा केला जाईल. चला तर मग आता शिकूया ब्लॉग ,वेबसाईट कशा प्रकारे बनवावी.
1.  सर्व प्रथम आपण Gmail वर आपले ई-मेल खाते तयार करावे
2. त्यांनंतर www.blogger.com ही वेबसाईट ओपन करुन त्यात
   आपल्या ई-मेल अकाऊंटने लॉगिन करावे.
3.  लॉगिन केल्यानंतर खालील पेज ओपन होईल. यात New Blog वर 
    क्लिक करावे .





  

 4.    खालील विंडो मध्ये Blog Tittle टाईप करावे .



  तुमच्या ब्लॉगचा इंटरनेटवर address काय ठेवायचा आहे तो  
          Address या रकान्यात टाईप करावा.

   Template  यामध्ये तुमच्या ब्लॉगला कशा प्रकारचे Background हवे       असेल ते खाली दिलेल्या डिझाईन मधून Select करावे. व खालील             Create Blog वर क्लिक करावे.

5.  आता आपला ब्लॉग तयार झालेला आहे. व खालील विंडो दिसेल. View      Blog वरक्लिक केल्यास तुम्हाला  तुमचा ब्लॉग दिसेल.




6.    खाली दिलेल्या विडोंमध्ये  View Blog शेजारील पाँइंटवर क्लिक             केल्यास आपणास  Post, Pages, Layout, Templates, Setting         यासारख्या अनेक ऑपशनदिसतील त्या वापरुन तुम्ही तुमचा ब्लॉग             सजवू शकता.



7.   आपण तयार केलेल्या ब्लॉगचे आपणास जर वेबसाईटमध्ये रुपांतर करायचे असल्यास आपण ते करु शकता माञ त्यासाठी वार्षिक काही रक्कम आपणास भरावी लागेल.

                                        ***धन्यवाद ***

No comments:

Post a Comment

सर्व शिक्षक बंधू व भगिनींना विनंती आहे की,फक्त शैक्षणिक उपयोगिताकरिता/शाळेतील शिक्षक,विध्यार्थी यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी/माहितीसाठी ब्लॉगचा वापर करावा.