अतिमहत्वाचे

सुस्वागतम ...सुस्वागतम ...सुस्वागतम ...zppsraigavhan.blogspot.com वर मी श्री .भारत जलिंदर सावंत ( स.शि. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायगव्हाण ता.परतूर जि.जालना )आपले सहर्ष स्वागत करीत आहे ...

हेडमास्तरांचे अब्राहम लिंकनना पत्र

हेडमास्तरांचे अब्राहम लिंकनना पत्र




प्रिय  लिंकनजी
       या गुरुकुलातील आयुष्यात मला मिळालेले हे प्रथम पत्र. आपली मानव जातीवर असलेली नितांत श्रध्दा आणि प्रकांड पंडीतांच्या तोलामोलाच्या विचाराच्या वारसा आपल्या मुलाला लाभला असल्याचे जाणीव मला आहे. त्याच्यात असलेल्या जाणिवांना आकार देण्याची जबाबदारी कर्तव्य म्हणून मी केंव्हाच स्विकारली आहे. तो आपला मुलगा म्हणून नव्हे तर या गुरूकुलातील माझा शिष्य म्हणून !
     लिंकनजी,
आत्म्याच्या महात्म्याची मी त्याला ओळख करून दिली आहे. गुंडाना भिण्याचा आणि गुंडानी त्याला घाबरण्याचा प्रश्न कधीच उपस्थित होणार नाही कारण आत्मा उन्नत झाला की त्या प्रबळ आत्मशक्तीमुळे गुंड आपली सारी हत्यारे फेकत असतात. शस्त्र आणि पैश्याच्या जोरावर गुंड जगतात . पैसा नष्ट होतो आणि शस्त्र मोडता येतात.
    लिंकनजी,
स्वार्थी राजकारणाच्या या जगात या माझ्या विद्यार्थ्याला खेचु नका. आपण राजकारणाच्या कुटील राजनितीतही सक्षम राहिलात परंतू केवळ भावना शब्द आणि पुस्तकाच्या या जगात तो राजकारणाचे धडे गिरवू शकणार नाही त्याला तुम्ही शिकवा घरातल्या शाळेत त्याने चालवावा वारसा तुमचा तत्वांच्या विचारांचा तो कधीच असु नये उत्तराधिकारी तुमच्या खुर्चीचा. तुमचा मुलगा म्हणून जन्म मिळाला आहे त्याचे  परम भाग्य पण स्वताच्या भाग्याचा निर्माता तो स्वाताच असावयास हवा. या गुरुकुलातील शेकडो विद्यार्थ्यासोबत त्याला सामान्य बनून यायला सांगा तुमच्या कर्तृत्वाच्या पडछायांचा अहंकार त्याला शिवणार नाही याची तुम्ही काळाजी घ्या मात्र तुमच्या कर्तृत्वाच्या तेजोवलयात त्याचे फुलणारे आयुष्य करपणणार नाही याची तुम्ही जाणीव ठेवा.
     लिंकनजी,
त्याला त्याचा विचार करु द्या. तुमच्या विचारांच्या आवडी – निवडींची सक्ती त्याच्यावर कधीच लादू नका.  तुमचे आकाशाला गवसणी घालणारे श्रेष्ठ्त्व. या आकाशात तो भरारी घेईलच असे नाही कदाचीत त्याच्या पंखातले बळ कमी पडेलही म्हणून ‘कर्तव्यशून्य’ म्हणून त्याला निराश करू नका. प्रयत्नाने तो सर्व काही शिकेलच. मी व माझे सहकारी त्याला शिकवतात पुस्तकातल्या शब्दांचे अर्थ व्याकरणातले संदर्भ लेख, आलेख , गणितांची सुत्रे पण तुम्हालाही व्हावे लागेल त्याचे शिक्षक ! कारण तो शोध घेत पृथ्वीच्या पोटातील रहस्यांचा, समस्त मानवजात आणि त्याच्या नितीनियमांचा येथल्या अनाकलनिय घटनांची उकलही तुम्हास करून द्यावी लागेल. मात्र तुम्हाला त्यावेळी वडीलांची भूमिका बदलावी लागेल....

No comments:

Post a Comment

सर्व शिक्षक बंधू व भगिनींना विनंती आहे की,फक्त शैक्षणिक उपयोगिताकरिता/शाळेतील शिक्षक,विध्यार्थी यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी/माहितीसाठी ब्लॉगचा वापर करावा.